JAMNER TALUKA EDUCATION SOCIETIE'S

GITABAI DATTATRAY MAHAJAN ARTS, SHRI. KESHARIMAL RAJMAL NAVALAKHA COMMERCE & MANOHARSETH DHARIWAL SCIENCE COLLEGE

Jamner [Dist - Jalgaon]

जामनेर महाविद्यालयात युवती सभेचा जल्लोष

  • Date: Tuesday, Sep 23, 2025
  • Time: 8:00 AM - 5:00 PM
  • Location: ACS COLLEGE JAMNER
Featured Image

 

 

जामनेर महाविद्यालयात युवती सभेचा जल्लोष  दिनांक २३/९/२०२५ रोजी जी डी एम आर्ट्स के आर एन कॉमर्स ऍण्ड एम डी सायन्स कॉलेज, जामनेर वरिष्ठ महाविद्यालयाच्या युवती सभा तर्फे Traditional Day and Saree Day साजरा करण्यात आला.त्यात विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवती सभा प्रमुख सौ. डॉ. उज्वला गावित यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र खडायते हे होते. त्यांनी सुद्धा गांधी टोपी घालून Traditional Day या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. कला शाखेचे विभाग प्रमुख प्रा. विजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना Traditional Day चे महत्व समजावून सांगितले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डी एस पाटील, भूगोल विभाग प्रमुख डॉ. अमर पवार यांनी आपली उपस्थिती दिली. व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. मनीषा चौधरी यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. वर्षा मानवटकर, प्रा. डॉ. कोमल चूघ, प्रा. प्रणिता सुतार, डॉ. सीमा सरताळे, प्रा. नीलिमा चौधरी यांनी योगदान दिले