JAMNER TALUKA EDUCATION SOCIETIE'S

GITABAI DATTATRAY MAHAJAN ARTS, SHRI. KESHARIMAL RAJMAL NAVALAKHA COMMERCE & MANOHARSETH DHARIWAL SCIENCE COLLEGE

Jamner [Dist - Jalgaon]

जामनेर महाविद्यालयात रक्तदान शिबीराचे उत्साहात आयोजन आज दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9ते2 यावेळेत गीताबाई दत्तात्रय महाजन कला केशरीमल राजमल नवलखा वाणिज्य व मनोहर धारीवाल विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत व रेडप्लस ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त दान शिबीर आयोजित करण्यात आले

  • Date: Friday, Sep 19, 2025
  • Time: 8:00 AM - 5:00 PM
  • Location: ACS COLLEGE JAMNER
Featured Image

 

जामनेर महाविद्यालयात रक्तदान शिबीराचे उत्साहात आयोजन आज दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9ते2 यावेळेत गीताबाई दत्तात्रय महाजन कला केशरीमल राजमल नवलखा वाणिज्य व मनोहर धारीवाल विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत व रेडप्लस ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त दान शिबीर आयोजित करण्यात आले या शिबिराचे प्रमुख उद्घाटक म्हणून जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय जितेंद्र बाबुराव पाटील यांच्या हस्ते रिबीन कापुन रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉ. आर. एस.खडायते हे होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना एककाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.डी.वाघ यांनी रक्तदानाचे महत्व समजावून दिले, रक्तदानाचे फायदे डॉ.रविंद्र पाटील यांनी केले तर रक्त दान ही सामाजिक गरज आहे, असे विचार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस‌.खडायते यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.रणधीर जाधव यांनी केले तर आभार महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.मनिषा चौधरी यांनी केले. यावेळी 17 रक्तदान दात्यांनी रक्त दान केले त्यात प्रा.डाॅ.अमेया लोहार्, डॉ,विजयेद्र पाटील, डॉ.राहुल नवघरे ,प्रा.सौरभ जोहरे.प्रा.मोरे.प्रा.प्रतिक जैन,श्री.रामेश्र्वर पारधी, व विद्यार्थ्यांनी केले रक्तदान शिबीरासाठी रक्त संकलन करण्यासाठी रेडप्लस ब्लड बँक तर्फे डॉ.रविंद्र पाटील, डॉ.रितेश जोशी , डॉ.आकाश कोळी , डॉ.दानीश खान , डॉ.वैष्णवी परदेशी आणि डॉ.मोहिनी जुभंळे हे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व महाविद्यालयांतील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी‌ महत्वाचे योगदान दिले.