दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी आमच्या जामनेर महाविद्यालयात कवी कुसुमाग्रज जयंती राजभाषा मराठी गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला
Date:Tuesday, Feb 27, 2024
Time:8:00 AM - 5:00 PM
Location:ACS COLLEGE JAMNER
दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी आमच्या जामनेर महाविद्यालयात कवी कुसुमाग्रज जयंती राजभाषा मराठी गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला हा कार्यक्रम मराठी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर ए आर पाटील हे होते तसेच याप्रसंगी इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक डी एस पाटील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक भालचंद्र पाटील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर अक्षय घोरपडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविकेत प्राध्यापक डॉक्टर विजेंद्र पाटील यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्य संपदेविषयी माहिती दिली तसेच कवी कुसुमाग्रज यांच्या मराठी भाषेच्या योगदानाबद्दल एक साहित्यिक म्हणून केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली विद्यार्थ्यांनी सुद्धा कवी कुसुमाग्रज यांच्या कविता वाचन करून दाखविल्या कणा या कवितेने उपस्थित श्रोत्यांची दाद मिळविली याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रम प्रसंगी प्रथम द्वितीय व तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी आमच्या जामनेर महाविद्यालयात कवी कुसुमाग्रज जयंती राजभाषा मराठी गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला.