JAMNER TALUKA EDUCATION SOCIETIE'S

GITABAI DATTATRAY MAHAJAN ARTS, SHRI. KESHARIMAL RAJMAL NAVALAKHA COMMERCE & MANOHARSETH DHARIWAL SCIENCE COLLEGE

Jamner [Dist - Jalgaon]

Science Forum 2025-26 Innaguration Report

जामनेर महाविद्यालयत रानभाजी महोत्सव व सायन्स फोरमचे उद्घाटन उत्साहात संपन्न दिनांक : ७ ऑगस्ट २०२५ | वेळ : सकाळी १० ते १२ जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित आर्ट्स, कॉमर्सअँडसायन्सकॉलेज, जामनेरयेथे

"रानभाजी महोत्सव व सायन्स फोरमचे उ‌द्घाटन" दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० ते१२ या वेळेत मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री.जितेंद्र बाबुराव

पाटील, सचिव श्री. जितेंद्र रमेश पाटील, तसेच K. B. C. North Maharashtra University, Jalgaon चे सिनेट सदस्य श्री. दीपक बंडू पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या उपक्रमात सायन्स शाखेतील २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्यांचे प्रदर्शन मांडले, ज्यामध्ये त्यांच्या औषधी उपयोग, पोषण मूल्ये आणि त्यापासून तयार केलेले विविध पारंपरिक व चविष्ट पदार्थ सादर करण्यात आले.  कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्य प्रा. आर. एस. खडायतेयांचे लाभले. याचे यशस्वी आयोजन सायन्स फोरमच्या अध्यक्षा प्रा. वर्षा मानवतकर, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. यू.जी. गावित, तसेच सायन्स फोरम कमिटीचे सदस्य प्रा. एस. आर. थोसरे, प्रा. एम. टी. चौधरी, प्रा. ए. आर. पाटील, प्रा. आय. एम. जाधव, प्रा. ए. एस. सबदारा आणि श्री. कैलास सोनवणे यांनी केले. रानभाजी म्हणजे शेती किंवा मशागत न करता, नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या वनस्पती. या भाज्या प्रामुख्याने जंगलात, शेताच्या बांधावर किंवा माळरानावर आढळतात. या भाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात आणि त्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हा उपक्रम विद्या मध्ये संशोधनात्मक दृष्टिकोन विकसित करण्या सोबतच स्थानिक जैवविविधते चे, पा रंपरिक अन्न संस्कृती चे आणि पर्यावरण पूरक जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला.