सूचना
सर्व माजी विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, आपल्या महाविद्यालयात दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रविवार रोजी सकाळी 9:00 वा. माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व माजी विद्यार्थ्यांनी मेळाव्याला हजर राहावे अशी आपणास समितीमार्फत विनंती करण्यात येत आहे.
माजी विद्यार्थी समिती प्रमुख
प्रा रणधीर जाधव. प्राचार्य ए.आर.पाटील.
अभिनंदन आबासाहेब गोतमारे* 💐💐 💐दैनिक नवभारत व दैनिक नवराष्ट्र तर्फे जळगाव येथे आयोजित सन्मान सोहळा 2023 साठी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मधून जामनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आबाजी रामदास पाटील यांना 'मोस्ट रेप्यूटेड प्रिन्सिपल' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा !!*
👏🏻💐💐💐👏🏻
अहवाल
अहवाल सादर करण्यात येतो की आज दिनांक 10 मार्च 2023 रोजी सकाळी नऊ तीस वाजता महाविद्यालयातील समुपदेशन समितीच्या वतीने सेमिनार हॉलमध्ये जामनेर शहरातील नामांकित योगशिक्षक श्रीमती ममता शर्मा यांचे “हर घर ध्यान” या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. प्रथम प्रस्ताविक करताना प्रा. आर.यु. जाधव यांनी म्हटले की आजचे युग हे ताण-तणावाचे युग आहे आणि या ताणतणावाच्या युगात प्रत्येकाला आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळणे अत्यंत कठीण झाले आहे. प्रत्येकावर कोणत्या ना कोणत्या प्रकारचे दडपण आहे. अशावेळी जर आपण नियमितपणे प्राणायाम केले तर आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात नक्कीच सुधारणा होईल आणि आपली कार्यक्षमता ही वाढेल.
या कार्यक्रमाच्या दरम्यान श्रीमती ममता शर्मा (योगशिक्षक) यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह योगाचे, ध्यान-धारणेचे आणि प्राणायामाचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्वतः प्राणायामाचा अनुभवही घेतला.
या कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ.प्रज्ञा साठे यांनी देखील विद्यार्थ्यांना नियमितपणे प्राणायाम करण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी व्यक्तिशः भेटून असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा महाविद्यालयात आयोजित केले जावेत अशा प्रकारची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभागातील प्रा. डॉ.अरविंद राऊत यांनी केले तसेच डॉ. मनीषा चौधरी यांनी उपस्थिताचे आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालय परिवारातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
[edu_gallery gallery_view="gallery-v-1" galleries="‹º›‹²›3294‹²›‹¹›" __fw_editor_shortcodes_id="b8905a7ae78e974b1bba3020b90f0059" _array_keys="{‹²›galleries‹²›:‹²›galleries‹²›}" _fw_coder="aggressive"][/edu_gallery]
📌(महत्त्वाची सूचना - कोविड-19 स्थिती नियंत्रणात आल्यानंतर, प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार महाविद्यालय सुरळीतपणे सुरू झाल्यावर, प्रवेशा सबंधीची मुळ कागदपत्रे व 2 झेरॉक्स प्रती सह प्रवेश समितीकडून तपासून जमा केल्यानंतर, निर्धारीत केलेल्या निकषानुसार व विहीत प्रवेश शुल्क भरल्यानंतर "प्रवेश निश्चित" करण्यात येईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रथम प्राध्यान्य देण्यात येईल.)